शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावे

0

लोकशाही न्युज नेटवर्क
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनांसाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
सन 2022-23 शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने बाकी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी रजिस्ट्रेशन 69% दिसून येत आहे. त्यामागील वर्षाचे तुलनेत 31% विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत. तरी अनुसूचित जातीच्या भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ अर्ज सादर करावे, असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.