Sunday, May 29, 2022

रस्ता अडवून दोन विद्यार्थिनींचा विनयभंग; संशयित अटकेत

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

अमळनेर येथील दोन शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयिताला अटक केली असून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

१६ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी अमळनेर येथे एका भागात राहते. १८ एप्रिल सोमवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी तिच्या इतर दोन मैत्रिणींसोबत पायी घरी जात होत्या. त्यावेळी संशयित आरोपी असलम खान पठाण रा. देवपुर, धुळे हा रिक्षा घेऊन विद्यार्थिनींच्या पाठलाग केला. तीनही विद्यार्थिनी पायी जात असताना संशयिताने रिक्षा थांबवली यातील एका विद्यार्थिनीचा हात पकडला. व सोबत चल असे सांगून तिचा विनयभंग केला.

दरम्यान विद्यार्थिनीने हात झटकून इतर मैत्रिणींसोबत पुढे पायी जायला निघाल्या. पुन्हा संशयित आरोपी असलम खान पठाण याने तीनही विद्यार्थिनींचा पुन्हा रिक्षाने पाठलाग करून त्यांचा रस्ता आडविला. यातील दुसऱ्या विद्यार्थिनीचा हात पकडून म्हणाला की, ‘ही नाही येत तर तू तरी चल, आपण दोघे फिरायला जावू’ असे सांगून तिचा देखील विनयभंग केला.

यावेळी तीनही विद्यार्थिनी प्रचंड घाबरल्या. त्यांनी हा सर्व प्रकार घरी परत आल्यानंतर पालकांना सांगितला. यावेळी पालकांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित आरोपी असलम खान पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ यांच्या पथकाने संशयित आरोपी असलम खान पठाण याला अटक केली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या