Friday, May 20, 2022

राज्यातील शाळांचा वीजपुरवठा खंडित करणार नाही- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राज्यात सध्या लोडशेडिंगचे संकट उभे राहिले आहे. तसेच राज्यातील 689 शाळांचे वीजबिल थकल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर हे वीजबिल भरल्याचेही राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात महावितरणकडे बिल भरणा झालेला नाही. तरीही यासाठीची रक्कम देण्यात आली असून त्वरीत वीज जोडणी द्यावी, असे सांगण्यात आले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

- Advertisement -

औरंगाबादमधील सातारा गावातील जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारी अभियानातील पहिले पाऊल या राज्यस्तरीय मेळाव्यात त्या बोलत होत्या. तसेच वीज बिल थकबाकीमुळे राज्यातील जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा आणि इतर कोणत्याही शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

शाळांसाठीचे निर्णय

– या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम देत असून द्विभाषी व इंटिग्रेटेड पुस्तकेही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. आदर्श शाळांतील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम यावर्षी बदलणार आहेत.

– शाळांच्या वीज बिलासाठी मागील वर्षी 07 कोटी रुपये दिले होते. यावर्षी 14 कोटी दिले. ज्या शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला, तो तत्काळ जोडणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

– मराठवाड्यातील निजामकालीन 488 शाळांसाठी मागील वर्षी 54 तर यावर्षी 300 कोटींची तरतूद केली जाईल.

– आदर्श शाळांना निधी प्रदान केला जाईल.

– शासकीय शाळांतील 06 हजार पदे भरणार असून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तातडीने करण्याच्या सूचना विभागीय उपसंचालकांना देण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

तसेच यावेळी त्यांनी दहावी आणि बारावी इयत्तेच्या निकालाविषयी प्रतिक्रिया दिली. वर्षा गायकवाड म्हणाल्या, जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावी तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. टीईटी संदर्भात पोलिसांच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या