लोकशाही न्यूज नेटवर्क
(दि 8) रोजी के.सी इंग्लिश मेडीयम स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बालक पालक समुपदेशन डॉ. विवेक काटदरे, माया धूप्पल, प्राचार्य माधुरी कुलकर्णी, आबासाहेब कापसे, वैभव पाटिल, पालक प्रतिनिधी म्हणून रेल्वे मेल सर्व्हिस जळगाव कार्यालयाचे कॅशियर/चेकर दिपक डी.पाटिल तसेच SBI चे सचिन पाटिल उपस्थित होते.
याप्रसंगी दिपक डी पाटिल यांनी के.सी स्कुलद्वारा वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, सहली, साहसी क्रीडाप्रकार याबाबत आपले मत मांडले. भारतीय परंपरेप्रमाणे विविध उत्सव शाळेद्वारा साजरे केले जातात. यातून लहान बालकांच्या मनावर संस्कार शाळेकडून केले जातात. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर, धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर देश टिकेल याबद्दल आपले मनोगत मांडले तसेच के.सी स्कुलच्या सर्व महिला शिक्षक स्टाफचें मनपूर्वक आभार देखील मानले.
यामध्ये प्ले ग्रुप, नर्सरी ज्यूनियर आणि सिनियर के.जि च्या विध्यार्थ्यांना आपला सहभाग नोंदवला. विविध विषयांनवर आधारित गाण्यांवर तसेच मोबाईल, सोशल मीडिया जनजागृती, जागरण, गोंधळ अशा बऱ्याच गाण्यावर शाळेच्या चिमुकल्यांनी आपला सहभाग नोंदवला.