जळगाव
भारतातील सर्व इंजिनिअरिंग कॉलेज ची सर्वोच्च सस्था एआयसीटीई चे माजी अध्यक्ष व रामदेव बाबा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डी. एस. एस. मंथा आणि यशस्वी उद्योजक स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक भूमिपुत्र मा. दीपक चौधरी यांच्या हस्ते एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण २४ नोव्हेंबर २०२४, रविवार सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्य गृह. जळगाव येथे होणार आहे.
तंत्र शिक्षण विद्यार्थी केंद्रित करून ते जागतिक दर्जांचे करताना संबंधित संस्थाचा दर्जा उंचावण्यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारीचे महत्व अधोरेखित करत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्लीच्या कार्यपद्धतीत मुलभूत घडविणारे प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉ एस. एस. मथा है तरुणांना तंत्र शिक्षणाकडे कसे जाता येईल व जागतिक स्पर्धेत स्वतःला कसे सिद्ध करता येईल व गुराख्याचा मुलगा ते जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर इंजिनिअर बनून २७०० कोटींची उलाढाल करणारा यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविणारे भूमिपुत्र मा. दीपक चौधरी हे उद्योग क्षेत्रात यशस्वी कसे होता येईल यासाठी आपल्या अमोध वत्कृत्वातून उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी प्रेरणादायी, अद्भुत आणि करिअरला नवीन दिशा देण्याचा जीवन प्रयासाचा पट त्यांच्या मार्गदर्शनातून उलगडणार आहे. हे मार्गदर्शन मुले व तरुणांसोबतच मोठी स्वप्ने पाहणाऱ्या सर्वांसाठीच अतिशय मोलाचे ठरणार आहे.
विदयाधींना यशाचा महामंत्र देणाऱ्या ह्या कार्यकमाला सर्वांनी उपस्थित रहावे. त्याचा जीवन प्रवास व करिअरला दिशादर्शक असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. तरी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राध्यापक, विद्यार्थी चळवळीशी सबंधित शिक्षणप्रेमीनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन एसडी-सीड अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा श्रीमती मीनाक्षी जैन, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी आणि संचालक मंडळ, मार्गदशन समिती व सर्व तालुका समन्वयक यांनी केले आहे.