Saturday, November 26, 2022

SBI चा ग्राहकांना झटका; खर्चाचं बजेट बिघडणार?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. यामुळे ग्राहकांचं खर्चाचं बजेट बिघडू शकतं. SBI ने रेपो रेट वाढवल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहे. आता देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (State Bank of India) कर्ज घेणे महाग होणार आहे.

नवीन आणि जुन्या ग्राहकांचा यामुळे EMI देखील वाढणार आहे. SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) वाढवल्याने कर्जाचे व्याजदर वाढणार आहे. म्हणजेच होम लोन, कार लोन, पर्सनल लोन आधीपेक्षा जास्त व्याजदराने मिळतील. बँकेने MCLR मध्ये वाढ केल्यानंतर नवीन दर आजपासून म्हणजेच 15 जुलैपासून लागू होतील.

काय असतीन नवीन दर?

याआधी जूनमध्येही एसबीआयने MCLRमध्ये वाढ केली होती.  SBI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एक वर्षाच्या कर्जासाठी MCLR 7.40 वरून 7.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. सहा महिन्यांच्या कर्जासाठी MCLR 7.35 वरून 7.45 टक्के करण्यात आला आहे. दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी MCLR 7.70 टक्क्यांवरून 7.80 टक्के करण्यात आला आहे. SBI यावर्षी एप्रिलपासून MCLR वाढवत आहे.

जूनमध्ये बँकेने MCLR 20 बेसिस पॉइंट्सने वाढवला होता. इतर बँकांनीही MCLR वाढवला अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे. HDFC बँक आणि ICICI बँकेनेही MCLR दर वाढवले ​​आहेत. HDFC ने सर्व मुदतीच्या कर्जासाठी MCLR वाढवला आहे. ICICI बँकेने सर्व मुदतीच्या कर्जासाठी MCLR 20 बेस पॉईंटने वाढवला आहे.

MCLR म्हणजे काय? 

MCLR हा बँक कर्जाचा बेंचमार्क आहे. या वाढीमुळे कर्जाचा व्याजदर वाढतो. यामध्ये घट झाल्यास कर्जाचा दर कमी होतो. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने यावर्षी मे महिन्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर जूनमध्ये रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली. दोन दरवाढीनंतर रेपो दर 0.90 टक्क्यांनी वाढला असून तो आता 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यानंतर सर्व बँकांनी त्यांच्या MCLRमध्येही वाढ केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या