SBI, HDFC नंतर आता ‘ही’ बँक देतेय दहा वर्षातील सर्वात स्वस्त Home Loan

0

मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने गृहकर्जावरील व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी केलं आहे. SBI नंतर आता खासगी क्षेत्रातील ICICI या बँकेनंही गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहे. ICICI बँकेनं गृहकर्जावरील व्याजदर आता 6.70 टक्के केलं आहे. त्यामुळे आपल्या स्वप्नातील हक्काचं घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच ज्यांनी यापूर्वीच घरासाठी कर्ज घेतलं आहे, त्यांचा EMIही कमी होणार आहे.

 

स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदरात नुकतीच कपात करुन ते 6.70 टक्क्यांवर आणलं आहे. त्या पाठोपाठ आता ICICI बँकेनंही शुक्रवारी 5 मार्च 2021 रोजी नवे व्याजदर लागू केले आहे.

 

10 वर्षात सर्वात कमी व्याजदर

बँकेनं दिलेल्या माहितीनुसार ICICI बँकेचा व्याजदर गेल्या 10 वर्षात पहिल्यांदात इतका कमी करण्यात आला आहे. 75 लाखाच्या गृहकर्जावर 6.70 टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे. तर 75 लाखापेक्षा अधिक गृहकर्ज असेल तर 6.75 टक्के व्याजदर आकारलं जाईल. जे लोक बँकेचे ग्राहक नाहीत, ते वेबसाईट किंवा अॅपच्या माध्यमातून डिजिटल स्वरुपात लवकरात लवकर गृहकर्जासाठी अर्ज करु शकतात. घर खरेदी करणाऱ्यांना डिजिटल स्वरुपात तात्काळ कर्जाला मंजुरी मिळेल.

 

SBI सह कोणत्या बँकांकडून व्याजदरात घट?

स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदर कमी करत ते 6.70 टक्के केले आहे. दरम्यान, ही सवलत फक्त 31 मार्चपर्यंतच असणार आहे. बँकेनं आपल्या ग्राहकांना प्रोसेसिंग फीमध्येही 100 रुपये सवलत दिली आहे. 75 लाखाच्या गृहकर्जावर 6.70 टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे. तर 75 लाखापेक्षा अधिक गृहकर्ज असेल तर 6.75 टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. तसंत तुम्ही YONO App द्वारे अप्लाय करत असाल तर तुम्हाला अजून 0.05 टक्के जास्ती सूट मिळेल.

 

कोटक महिंद्रा बँकेनंही आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. दरम्यान, ही कपात काही काळासाठीच करण्यात आली आहे. त्यामुळे कोटक महिंद्र बँकेचा गृहकर्जावरील व्याजदर 6.65 टक्क्यांवर आला आहे. ही कपात केल्यानंतर बँकेनं हा दावा केला आहे की, आमची बँकच ग्राहकांना सर्वात कमी व्याजदरावर गृहकर्ज देत आहे.

 

HDFC बँकेनंही आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेनं रिटेल प्राईम लेंडिग रेटमध्ये 0.05 टक्के कमात केली आहे. ही कपात 4 मार्च 2021 पर्यंत लागू होती. या कपातीनंतरत HDFC बँकेच्या गृहकर्जावरील व्याजदर 6.75 टक्के झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.