SBI मध्ये 2056 जागांसाठी बंपर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

0

भारतातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) भरती घेण्यात येत आहे. जे बॅकेत नोकरी करु इच्छित असणार आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी (SBI PO Recruitment 2021)अर्ज मागवण्यात येत आहे. याबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन (Online) पद्धतीने करायचा आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

रिक्त जागा  : एसबीआय पीओच्या एकूण २०५६ रिक्त जागा आहेत, त्यापैकी 810 पदे सामान्य श्रेणी, ओबीसी – 540 पदे, ईडब्ल्यूएस – 200 पदे, एससी – 300 पदे आणि एसटीसाठी 150 रिक्त आहेत. त्याचबरोबर ओबीसी – 20 पदे, एससी – 24 आणि एसटी – 12 पदे अनुशेषाच्या 56 रिक्त जागांमध्ये आरक्षित आहेत.

एकूण जागा : २०५६

पद : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे पदवी असणे आवश्यक आहे. जे उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षात किंवा सेमेस्टरमध्ये आहेत ते तात्पुरते अर्ज करू शकतात, जर मुलाखतीसाठी बोलावले तर त्यांना 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

वयाची अट : 1 एप्रिल 2021 रोजी उमेदवाराचे वय किमान 21 वर्षांचा असणे आवश्यक आहे. वयाची मर्यादा 30 वर्षे आहे.

पगार किती असेल?

मूळ वेतन – रु. 41,960 रु. 36,000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840. उमेदवार डीए, एचआरडी, सीसीए आणि इतर भत्त्यांसाठी पात्र असतील.

निवड प्रक्रिया :  पात्र अर्जदारांना तीन टप्प्यांच्या परीक्षेतून जावे लागेल, पहिल्या टप्प्यातील पात्र उमेदवार फेज – II आणि फेज – III मध्ये बसू शकतील. तिन्ही टप्प्यांत पात्र होणे अनिवार्य आहे. प्राथमिक परीक्षेचा पहिला टप्पा नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2021 मध्ये होणार असून त्यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रवेशपत्र दिले जातील. तर दुसरा टप्पा डिसेंबर 2021 मध्ये आणि तिसरा टप्पा म्हणजेच मुलाखत फेरी फेब्रुवारी 2021 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.

परीक्षा:

पूर्व परीक्षा: नोव्हेंबर/ डिसेंबर 2021

मुख्य परीक्षा: डिसेंबर 2021

परीक्षा ऑनलाईन : परीक्षेचा कालावधी:  1 तास

मुख्य : 3 तास

परीक्षेचा नमुना

प्रीलिम्स : 100 प्रश्न

मुख्य : 155 + 50

निवड प्रक्रिया : – प्राथमिक परीक्षा -मुख्य परीक्षा आणि – मुलाखत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाइन रजिस्ट्रेशन : 5 ते 25 ऑक्टोबर

अधिकृत संकेतस्थळ : www.sbi.co.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.