सावधान.. वीज चोरी प्रकरणी कडक कारवाई मोहीम

0

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

सावदा येथे वीज चोरी प्रकरणी कडक कारवाईची मोहीम मुंबईचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांनी पूर्ण जळगाव सर्कलसाठी मोहीम राबविली. यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा येथील टीम द्वारे कारवाई करण्यात आली. याचप्रमाणे रावेर यावल तालुक्यात एकाच दिवशी ही कारवाई करण्यात आली.

यामध्ये सावदा कोचूर, रोझोदा, मस्कावद, निंभोरा, थोरगव्हाण, उदळी, गहूखेडा याठिकाणी एकूण 205 वीज ग्राहकांचे मीटर चेक केले त्यात 77 वीज ग्राहकांनी चोरी केल्याचे आढळून आले असून त्यांचेवर भारतीय विद्युत कायदा 2003 चे कलम 135 प्रमाणे ही कारवाई करण्यात आली.

सदरील वीज चोरीची कार्यवाही टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी वीज चोरी न करता विजेचे बिल नियमित भरावे , ज्या ग्राहकांकडे वीज बिल कनेक्शन नसेल त्यांना नवीन कनेक्शन दिले जात आहे. तसेच ज्या लोकांची वीज भरण्याची तयारी नसेल अशांनी लवकरात लवकर सोलर सिस्टिम बसवून घ्यावे असे आवाहन उपकार्यकारी अभियंता डी.  आर. कोल्हे सावदा यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.