Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»सावखेडा शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ !
    ताज्या बातम्या

    सावखेडा शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 27, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सावखेडा शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ !

    चार शैक्षणिक संस्थांमध्ये एकाच रात्री चोरी

    जळगाव प्रतिनिधी शहरालगतच्या सावखेडा शिवारात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकााच रात्री चार शैक्षणिक संस्थांना लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ ते २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री वर्धमान सीबीएससी स्कूल, जी.एस. रायसोनी पब्लिक स्कूल, शानबाग शाळा आणि गुरुकुल किड्स या चार शाळांच्या मुख्य दरवाजांची कुलुपे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

    चोरट्यांनी नेमकेपणाने ‘अ‍ॅडमिन रूम’मध्ये घुसून ड्रॉवरमधील तब्बल १ लाख ९४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. शहरात आधीच वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक संतप्त असताना आता शाळांनाच ‘टार्गेट’ केल्याने पालक, शिक्षक आणि व्यवस्थापनामध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    चोरीची घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. वर्धमान शाळेचे प्राचार्य आशिष अजमेरा यांनी तत्काळ जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, या चारही शाळांमध्ये एकाच पद्धतीने चोरी झाल्यामुळे ही एकाच टोळीची कारवाई असल्याचा प्रारंभिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून चोरट्यांची टोळी शोधणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान ठरले आहे. या घटनेमुळे परिसरातील इतर शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून अतिरिक्त दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif