पारोळा ;- तालुक्यातील सावखेडे होळ येथील कै राजेंद्र चिंतामण पाटील यांनी १६ शनिवार रोजी दुपारी ४ वाजता कर्जबाजारीपणाला कंटाळून नैराश्यातून स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत प्रदीप मानसिंग पाटील यांनी पारोळा पोलिसात खबर दिली की ,शेतकरी राजेंद्र चिंतामण पाटील वय ५० यांच्यावर विकास सोसायटीचे व इतर कर्ज असून त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांच्या स्वतःच्या घरात स्लॅबच्या कडीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे.



