सावदा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

सावदा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सावदा, ता. रावेर येथील मस्कावद रोड परिसरातील भोईवाडा भागातील रहिवासी विनायक उर्फ विकी मोनज पवार (वय २१) यांनी शुक्रवारी दुपारी राहत्या घरात आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदण्याची कारवाही सुरू आहे.

भोईवाडा परिसरात विकी पवार हे आपली आई, विवाहित बहीण, एक लहान भाऊ यांच्यासह राहत होते. त्यांचे फैजपूर रोडवर पवार एक्क नावाचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी त्यांनी राहत्या घराच्या छताच्या कडीला दोरी लावून गळफास घेतला. या घटनेची माहिती सावदा पोलीस ठाण्याला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक फौजदार संजय देवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर गुन्हा नोंदणीचे काम सुरू आहे. घरातील आधार असलेला युवक गेल्याने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ते होतकरू यशस्वी उद्योजक तर सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.