भाजप शहराध्यक्षांवर हल्ला; १३ आरोपींना अटक

0

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क

सावदा येथील भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे यांच्यावर २८ नोव्हेंबर रोजी रात्री प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी १३ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे यांना दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कत्तलखान्याजवळ काही मुलांना जमाव मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. यावेळी ते आपल्या दुचाकीवरून तेथे गेले. याप्रसंगी बिलाल कुरेशी, अशफाक कुरेशी व कादीर कुरेशी यांच्यासह सुमारे ४० जणांच्या जमावाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.

जमावाने जितेंद्र भारंबे यांच्यासह इतरांवर लाठ्या-काठ्या आणि तलवारीने हल्ला केला. तसेच त्यांना पिस्तुलने धमकावून पिस्तुलीच्या दस्त्याने त्यांना मारहाण झाली. दरम्यान या हल्ल्यात जितेंद्र भारंबे यांच्यासह गणेश देवकर, पंकज चौधरी, पवन महाजन व राहूल पाटील हे जखमी झाले असून तर जितेंद्र भारंबे हे गंभीर जखमी झाले होते.

जमावाच्या विरोधात याप्रकरणी सावदा पोलीस स्थानकात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३ तसेच आर्म ऍक्ट ३/२५ व ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रारंभी तीन जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शेख बिलाल शेख अयुब कुरेशी (वय ३३, रा.सावदा), शेख कादीर शेख अयुब कुरेशी (वय २३, रा. सावदा मांगवाडा), शेख साबीर उर्फ बुढा शेख लाल (वय ३९, रा. इस्लामपुरा सावदा), शेख इकबाल शेख गफ्फार (वय ३६, रा. सावदा), शेख आबीद शेख लतीफ (वय ३०, रा.सावदा), रमजानखान उर्फ तासीफखान महेबुबखान (वय २६, रा. सावदा), शेख शाहबाज शेख जमील (वय २५ रा. सावदा), शेख मुक्तार शेख अरमान (वय ३४, रा.सावदा), शेख कलीम शेख अयुब (वय ३४), अशफाकखान उर्फ अबु असलमखान (वय २१, रा. खाजानगर), मोईन उर्फ मोयालाला शेख हसन (वय २७, रा. खाजानगर), शेख साबीर उर्फ अल्लारखा शेख खलील (वय ३४, रा. चांदणी चौक); मुजम्मीलखान अजगरखान (वय २२, रा. खाजानगर) यांचा समावेश आहे. तर २० जण फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

दरम्यान पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून कुणीही अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता तसेच सलोखा कायम राखावा.

Leave A Reply

Your email address will not be published.