आचार्य सत्येंद्र दास यांना शरयू नदीत जलसमाधी (व्हिडीओ)
अयोध्या रामजन्मभूमी मंदिराचे होते मुख्य पुजारी
अयोध्या, लोकशाही न्यूज नेटवर्क
अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी निधन झाले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी महंत सत्येंद्र दास यांना शरयू नदीच्या तुळशीदास घाटावर जलसमाधी देण्यात आली.
https://x.com/ANI/status/1889974707728126294
यापूर्वी त्यांचे पार्थिव रथावर बसवून शहरभर फिरवण्यात आले. सनातन धर्मात साधू-संतांच्या अंतिम संस्कारासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. यापैकी एक म्हणजे संताचे पार्थिव अंत्यविधी न करता नदीत विसर्जित करण्यात येते. त्याला जलसमाधी म्हणतात.
सत्येंद्र दास हे अयोध्याराम मंदिराचे मुख्य पुजारी होते. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. निर्वाणी आखाड्यातून आलेल्या अयोध्येतील प्रमुख संतांपैकी ते एक होते. वयाच्या 85 व्या वर्षी बुधवारी त्यांचे निधन झाले.