चक्क मंत्र्याला जेलमध्ये मिळतेय मसाज; व्हिडीओ व्हायरल

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering case) तिहार जेलमध्ये (Tihar Jail) असलेल्या दिल्लीच्या आप सरकारमधील (Aam Aadmi Party) मंत्री सत्येंद्र जैन (Delhi Minister Satyendra Jain) यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral video) होत आहे. या व्हिडिओत सत्येंद्र जैन हे जेलमध्ये मसाज करून घेत आहे. ही जेल आहे की मसाज पार्लर असा प्रश्न तुम्हाला हा व्हिडीओ पाहून पडला असेल.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय. मंत्री जैन जेलमधील बेडवर पडले असताना त्यांच्या पायाची एक व्यक्तीकडून आरामात मालिश सुरु आहे तर जैन पेपर वाचताना दिसत आहेत. तिहार तुरुंगातील व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे. या व्हिडीओनंतर जेल प्रशासनावर आक्षेप याप्रकरणी ईडीने (ED) कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी ईडीने ताब्यात घेतले. सध्या जैन हे तिहार जेलमध्ये सात नंबरच्या सेलमध्ये आहेत. दरम्यान त्यांनी मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आल्यानंतर जेल अधीक्षक यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यासोबत 35 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही आता गृहमंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.