Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण» महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला शनिवारचा मुहूर्त?
    राजकारण

     महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला शनिवारचा मुहूर्त?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 12, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुंबई

    राज्यात विधानसभा निवडणुका होऊन आणि निकाल लागून आता अनेक दिवस झाले आहेत, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी पार पडतो, याकडे लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (बुधवारी) रात्री दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली असल्याची माहिती आहे. शनिवार दि. 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त असल्याची माहिती समोर आली आहे.

    मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला किमान 23 मंत्रिपदे हवी असून, सध्या तरी त्यांच्याकडून 25 मंत्रिपदांची मागणी केली जात आहे. शिवसेनेला 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ते 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. फडणवीसांची अमित शहांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. हिवाळी अधिवेशनाच्या आधी खातेवाटप होणार असल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात शनिवारी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांवर हिवाळी अधिवेशनानंतर विविध खात्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता दि. 14 डिसेंबरचा मुहूर्त असल्याच्या चर्चेने आमदारांची धाकधूक वाढली आहे. त्याचबरोबर काही नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता असल्याने आता सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागले आहे.

     

    शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांना भाजपचा विरोध

    आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. शिवसेनेतील काही आमदारांनीही सत्तार यांच्या नावाला विरोध केल्याची माहिती आहे. डॉ. तानाजी सावंत, माजी मंत्री संजय राठोड यांनाही सत्तेत सामील करून घेण्यास भाजपचा विरोध आहे. शिंदे मात्र सावंत यांच्या समावेशाबाबत आग्रही आहेत. सावंत यांनी आरोग्यमंत्री म्हणून उत्तम काम केले असल्याचे त्यांनी भाजपला सांगितले आहे.

    #bjp Cabinet Expansion Chief Minister Devendra Fadnavis Delhi Deputy Chief Minister Ajit Pawar Deputy Chief Minister Eknath Shinde
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif