बॉलीवूडवर शोककळा, सतीश कौशिक यांचे दुःखद निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सर्वांनाच आपल्या अभिनयाने पॉट धरून हसविणार दिलखुलास व्यक्तिमत्त्व सतीश कौशिक यांनी आपापल्या अभिनयाद्वारे सर्वांनाच पोर धरून हसविले. सतीश कौशिक यांना वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सतीश यांना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान सतीश कौशिक यांचं निधन झालं. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सतीश कौशिक पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका कौशिक यांना सोडून गेले आहेत.

बॉलिवूडमध्ये सतीश कौशिक यांनी अनेक वर्ष काम केलं. त्यांनी ‘मौसम’ सिनेमातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरु केलं. अभिनेते, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात देखील सतीश कौशिक यांनी मोलाची कामगिरी केली. आपल्या विनोदबुद्धीने त्यांनी अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सतीश कौशिक यांनी जवळपास १०० सिनेमांमध्ये काम केलं. सतीश कौशिक यांचं पार्थिव शरीर सध्या गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आता त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दिल्लीतील दीनदयाल रुग्णालयात नेण्यात येणार आहे. जिथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांचं पार्थिव शरीर मुंबई येथे आणण्यात येणार आहे. सतिश कौशिक यांच्यावर गुरुवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे. शवविच्छेदनानंतर सतीश कौशिक यांचा मृतदेह मुंबईमध्ये आणणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here