Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»सातारा जिल्हा परिषद निवडणूक राडा : पालकमंत्री देसाई रक्तबंबाळ!
    संपादकीय

    सातारा जिल्हा परिषद निवडणूक राडा : पालकमंत्री देसाई रक्तबंबाळ!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 24, 2026No Comments184 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    चार दिवसांपूर्वी झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जो राडा झाला तो अभूतपूर्व असा होता. 65 सदस्य असलेल्या सभागृहाच्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादी 20, शिवसेना 15, भाजप 27 , काँग्रेस एक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक असे पक्षीय बलाबल असताना या सभागृहात राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी पक्ष एकत्र आणि भाजप त्यांच्या विरोधात होते. परंतु या ठिकाणी 27 सदस्य असलेल्या भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष झाले. त्यावेळी जो राडा झाला त्यात पालकमंत्री शंभूराजे देसाई हे रक्तबंबाळ झाले. पोलिसांनी त्यांना फरफटत नेले आणि त्यांच्या हाताला रक्त लागले. 37 विरुद्ध 27 असे बलाबल असताना 27 सदस्य असलेल्या भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष झाले ही वस्तुस्थिती आहे. याप्रकरणी जो निवडणुकीत राडा झाला त्याला पोलिसांनी ही पूर्ण सहकार्य केले आणि शेवटी भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आले. भाजपचे बलाबल 33 इतके झाले. दोन सदस्य गैरहजर राहिले आणि 33 विरुद्ध 30 अशा फरकाने भाजपचे उमेदवार निवडले गेले. याप्रकरणी 100 च्या वर पोलीस ताफा होता आणि तो भाजपला सहकार्य करत होता. ज्या पालकमंत्री शंभूराज देसाई व्हीपी लागू करण्यासाठी तेथे गेले होते. त्यांना सभागृहात पोहोचूच दिले नाही. पोलीस आणि देसाई यांच्या जोरदार झटापट झाली. शंभूराज देसाई सभागृहात पोहोचले नाहीत आणि भाजपचा अध्यक्ष निवडून आला. भाजपचे अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे आमदार यांच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष पद दिले गेले हे विशेष होय. त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी यांच्याकडे बहुमत असताना देखील त्यांचा अध्यक्ष होऊ शकला नाही हे देखील विशेष. त्यानंतर त्यांचे कवित्व जोरदारपणे चालले. विधानसभेत प्रकरण गाजले. विधानसभेत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले . ‘…तर आम्ही आमचा राजीनामा देऊ’ इथपर्यंत मजल गेली. त्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर घडलेल्या आपबितीचा प्रकार कथन केला. पोलिसांनी देखील पालकमंत्र्यांचा अनन्वित छळ कसा केला हे सांगितले. त्यावर विधानसभेत सभागृहाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर देऊन त्यावर पडदा टाकला. पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना निलंबित करावी, अशी मागणी एकनाथ शिंदे आणि शंभूराजे देसाई यांनी केली. पण त्यावर पूर्ण चौकशी करून त्याचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले आणि त्यावर पडदा टाकला. वरच्या विधान परिषद सभागृहात हे प्रकरण आले. तेथे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी शंभर पोलिसांच्या ताफ्यासह कसा अन्याय केला, यावर जोरदार चर्चा झाली. तालिका अध्यक्ष असलेल्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हे सर्व ऐकल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना निलंबित करण्याची घोषणा केली. त्यानंतर तालिका अध्यक्ष पदावर असलेली सभापती राम शिंदे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाला स्थगिती दिली. म्हणजे उपसभापती नीलम गोरे यांनी दिलेला आदेश रद्दबादल केला.

    सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. त्या प्रश्नाची सभागृह दोन्ही सभापतींनी ‘ऐसी की तैसी’ केली. तरी भाजपचे नाव न घेता ‘एका पक्षाच्या वतीने जो राडा करण्यात आला त्याला पोलीस सहकार्य करत होते’ असे शंभूराज देसाई यांचे म्हणणे होते. त्या म्हणण्याला काहीच अर्थ उरलेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा हा जिल्हा होय. याच जिल्ह्यात त्यांचे दरेगाव आहे. त्यांनी सुद्धा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवला, परंतु सत्ताधाऱ्यांपुढे काही चालले नाही. एकंदरीत एकनाथ शिंदे यांचे जोरदार खच्चीकरण झाले. यात हताश होऊन दोन्ही मंत्री गप्प बसले हे मात्र तितकेच खरे. सातारा हा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ज्या साताऱ्यात सुसंस्कृतपणा असायला हवा होता तो नसल्याने यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्याला गालबोट लागले आहे. सातारा जिल्हा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष मिळून एकूण 20 सदस्य निवडून आले आहेत. अजित पवार जर जिवंत असते तर सातारा जिल्ह्यात झालेल्या झटापटी पाहू शकले नसते. अजित पवार जिवंत असते तर चित्र काही वेगळेच राहिले असते एवढे मात्र निश्चित. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद निवडणुकीवर अध्यक्ष, उपाध्यक्षच्या रूपाने शिवसेना ताबा घेण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न निष्फळ ठरला. एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धूळ चारण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला एवढे मात्र निश्चित. सातारा जिल्ह्यात एकूण चार कॅबिनेट मंत्री आहेत. दोन शिवसेनेचे आणि दोन भाजपचे. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले हे वरचढ ठरले आणि त्यांनी जिल्हा परिषदवर भाजपची सत्ता आणून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यातून शिवसेनेची पीछेहाट झाली हे तितकेच खरे आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीलाही धक्का तंत्र दिले हे देखील खरे आहे…!

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव

    November 8, 2026

    दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!

    November 7, 2026

    जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif