Friday, September 30, 2022

तब्बल सात लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

पाचोरा (Pachora) शहरातून दोन वाहनांमधून सुमारे सात लाखांच्या गुटख्यासह एकाला अटक करण्यात आली असून ही कारवाई अन्न व औषध प्रशासनातर्फे  ((Food and Drug Administration) करण्यात आली.

- Advertisement -

- Advertisement -

नाशिक येथील अन्न सुरक्षा अधिकारी तथा गुप्त विभागाचे अविनाश दाभाडे आणि जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी काल सायंकाळी पाचोरा शहरात संयुक्त कारवाई केली. शहरातील सिंधी कॉलनी भागात एमएच १९ सीवाय ००८९ (छोटा हत्ती) व एमएच १५ सीएम ८०२० (मारुती ओम्नी) या क्रमांकांची दोन वाहने संशयास्पदरीत्या आढळली.

दरम्यान या वाहनांची तपासणी केली असता त्यात राज्यात बंदी घातलेला गुटखा, पानमसाला आढळून आला. या मालाची किंमत ७ लाख ७ हजार १९५ रुपये एवढी असून दोन्ही वाहनांसह १० लाख ४७ हजार १९५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मुद्देमालासह सनी नावाच्या एका तरूणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या