Friday, December 9, 2022

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

31 ऑक्टोबर 2022 रोजी भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त पद्मालय, शासकीय विश्रामगृह येथे राजूमामा भोळे, सुनील महाजन, ललित कोल्हे, विष्णू भंगाळे, सुनील भंगाळे, वीरन खडके, पिंटू काळे, कुंदन काळे, अजित राणे, चंदन कोल्हे, प्रदीप भोळे, संजय पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

- Advertisement -

सदर बैठकीत 31 ऑक्टोबर 2022 रोजी भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त शोभा यात्रा काढणे व त्यामध्ये त्यांच्या जीवन परिचयावर सजीव आरास, सोरठी सोमनाथ मंदिर गुजरात प्रतिकृती, कालिंका माता मंदिर पावागड प्रतिकृती, सौराष्ट्र (गुजरात) ते खान्देशमध्ये आलेल्या गाड्यांचे प्रतिकात्मक देखवा, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावर आधारित जीवन चरित्र, बर्डोली सत्याग्रह माहिती, 565 संस्थानांचे अखंड भारतात विलीनीकरण, जुनागड-हैदराबाद संस्थेचे अखंड भारतात विलीनीकरण देखावा, वारकरी संप्रदाय विठ्ठल रुक्माई देखावा, प्रगतशील शेतकरी देखावा, लेझीम पथक, गुरव वाद्य, संस्कृतीक ढोल ताशा पथक, वारकरी पायी दिंडी असे नियोजन करण्यात आले. तसेच समाज प्रबोधनावर व्याख्यानमाला घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

यावेळी शोभा यात्रेचा मार्ग प्रारंभ:- शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नेहरू चौक, भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल टॉवर जळगाव शहर महानगरपालिका येथे समारोप.

तसेच  सदर बैठकीत भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव नियोजन समिती 2022 स्थापन करण्यात आली.  सल्लागार समितीमध्ये राजूमामा भोळे, जयश्रीताई महाजन, ललित कोल्हे, सुनील महाजन, विष्णू भंगाळे, लक्ष्मीकांत चौधरी, मनोज चौधरी, ललित भैय्या चौधरी, सुनील भंगाळे,   नारायण खडके, दीप्ती चिरमाडे, अध्यक्षा बहिणाबाई ब्रिगेड उज्वलाताई बेंडाळे, पिंटू काळे, डॉ. विरन खडके, शेखर अत्तरदे, कुंदन काळे, अमित काळे, प्रदीप भोळे, परेश  कोल्हे, चंदन  कोल्हे, प्रवीण कोल्हे, अजय बढे, मनोज वारके, संजय पाटील, गोपाळ खडके, महेंद्र पाटील, सर्व ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांचा समावेश आहे.

नियोजन समिती अध्यक्षपदी ललित चौधरी, कार्याध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्षपदी भूषण भोळे, लतेश चौधरी, निखिल रडे, शंतनू नारखेडे, योगेश काळे, सचिव सुनील बंटी भारंबे, उपसचिव मिलिंद चौधरी, कोषाध्यक्ष महेश चौधरी, उपकोषाध्यक्ष चैतन्य कोल्हे, ललित खडके.

समिती सदस्य पद-  पियुष कोल्हे, विशाल भोळे,  प्रशांत धांडे, पंकज बोरोले, अमोल धांडे, सुरेंद्र कोल्हे, दीपक धांडे, शुभम पाटील, प्रशांत चौधरी, गौरव कोल्हे, राहुल तळले, सुरज नारखेडे.

यावेळी ललित कोल्हे, सुनील महाजन,  सुनील भंगाळे यांनी 25 सदस्य कार्यकारणी जाहीर केली.  सर्व कार्यकारिणीचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष स्वागत केले. राजूमामा भोळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. व शोभायात्रा खूप मोठ्या जल्लोषात साजरी करावी यासाठी सर्वांना  शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या