कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान – मुख्यमंत्री

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील घाऊक बाजारात कांद्याचे गगनाला भिडलेले भाव चर्चेचा विषय ठरत आहेत. शेकडो टन कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम अर्थसंकल्पीय अधिवेशनावर झाला. कांदा उत्पादकांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यानुसार आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 रुपये प्रतिक्विंटल अनुदान मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 2016 मध्ये आम्ही कांदा शेतकर्‍यांना 100 रुपये अनुदान दिले होते, 2017 मध्ये ते 200 रुपये होते ते आता थेट 300 रुपये करण्यात आले आहे. आता नाफेडकडूनही कांदा खरेदी सुरू झाली आहे. साडेदहा रुपये दर आहे. या सगळ्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.