Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अध्यात्म»“भगवत्कथा करतांना द्रव्य घेऊ नये” : तुकाराम महाराज
    अध्यात्म

    “भगवत्कथा करतांना द्रव्य घेऊ नये” : तुकाराम महाराज

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 22, 2025No Comments7 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    संतांचिये संगती : भाग २३

     

    एक करिती गुरु गुरु। भोवता भारु शिष्यांचा॥१॥

    पुंस नाही पाय चारी। मनुष्य परी कुतरी ती॥२॥

    परस्री मद्यपान। पेंडरक्षण माजविले॥३॥

    तुका म्हणे निर्भर चित्ती। अधोगती जावया ॥४॥२८५१॥

     

    ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करोनी म्हणती साधू॥१॥

    अंगी लाऊनिया राख। डोळे झाकुनी करती पाप॥२॥

    दाऊनी वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा॥३॥

    तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती ॥४॥२८४७॥

     

    अंगी घेऊनिया वारे दया येती।

    ऐशा भक्ता हाती चोट आहे॥१॥

    देव्हारा बैसोनी हालविती सूपे।

    ऐसे पापी पापे लिंपताती॥२॥

    एकीबेकी न्याये येतसे प्रचीत।

    तेणे लोक समस्त भुलताती॥३॥

    तयाचे स्वाधीन दैवते असती।

    तरी का मरती पोरे त्यांची॥४॥

    तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा।

    भक्त कान्होबाचा तो ही नव्हे॥५॥३२३५॥

     

    जे तीर्थ, अंगारा देणारे ते श्रीकृष्णाचे भक्त नाहीत. दाढी डोई मुंडी। मुंडूनिया सर्व। पांघुरती बरवे वस्र काळी॥१॥ ऊफराठी काठी घेऊनिया हाती। उपदेश देती सर्वत्रांसी॥२॥ चाळवूनी रांडा, देऊनिया भेष। तुका म्हणे त्यास यम दंडी॥३॥ ३०४७॥ लावूनिया मुद्रा बांधूनिया कंठी। हिंडे पोटासाठी देशोदेशी॥१॥ नेसोनी कौपीन शुभ्रवर्ण जाण। पहाती पक्वान्न क्षेत्रींचे ते॥२॥ तुका म्हणे ऐसे मावेचे मईंद। त्यापासी गोविंद नाही नाही॥३॥ ३०४९॥

     

    भगवत्कथा करतांना द्रव्य घेऊ नये या विषयी संत तुकाराम महाराज यांचे अभंग-

     

    कथा करोनिया मोल ज्यापे घेती।

    तेही दोघे जाती नरकामध्ये॥१॥

    ब्रम्ह पूर्ण करा ब्रम्ह पूर्ण करा।

    अखंडीत स्मरा रामनाम॥२॥

    मधुर वाणीच्या नका पडो भरी।

    जाल यमपुरी भोगावया॥३॥

    तुका म्हणे करी ब्रम्हांड ठेंगणे।

    हात पसरी जिणे धिग् त्याचे ॥४॥(२४२७)॥

     

    जेथे कीर्तन करावे। तेथे अन्न न सेवावे॥१॥ बुका लाऊ नये भाळा। माळ घालू नये गळा॥२॥ तट्टा वृषभासी दाणा। तृण मागो नये जाणा॥३॥ तुका म्हणे द्रव्य घेती। देती तेही नरका जाती ॥४॥ (२४२९) मोल घेऊनिया कथा जरि करी । तरी भंगो हरी देह माझा॥१॥ तुका॥

    कथा करोनिया द्रव्य घेती देती।

    तया अधोगती नरकवास ॥१॥

    रवरव कुंभीपाक भोगीती यातना।

    नये नारायणा करुणा त्यांची॥२॥

    असिखड्गधारा छेदिती सर्वांग।

    तप्तभूमी अंग लोळविती॥३॥

    तुका म्हणे तया नरक न चुकती।

    सापडले हाती यमाचिया॥४॥९१८. (२४२५)

     

    आशाबध्द वक्ता भय श्रोतयांच्या चित्ता॥१॥ गातो तेही नाही ठावे। तोंड वासी काही द्यावे॥२॥ झाले लोभाचे मांजर। भीक मागे दारोदार॥३॥ ऊभयता लोभी मन। वाया गेले ते भजन॥४॥ बहिरे मुके एके ठायी। तैसे झाले तया दोन्ही॥५॥ माप आणि गोणी। तुका म्हणे रिती दोन्ही॥६॥ (२४२६) [काही चुकल्यास क्षमस्व।

     

    “ऊंच वस्रे नीच ल्याला। आणि समर्थ ऊघडाच बैसला। परी तो आहे परिक्षीला परीक्षवंती॥ दासबोध॥ ९-१०-७॥ अंगी घेऊनिया वारे दया येती। ऐशा भक्ता हाती चोट आहे॥१॥ देव्हारा बैसऊनी हालताती सुपे। ऐसे पापी पापे लिंपताती॥२॥ एकी बेकी न्याये होतसे प्रचीत। तेणे लोक समस्त भुलताती॥३॥ तयाचे स्वाधीन दैवते असती। तरि का मरती पोरे त्यांची॥४॥ तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा। भक्त कान्होबाचा तोही नव्हे॥५॥ [३२३५] माळा मुद्रावरी। कैसा सोंगे जोडे हरी॥तुका॥

    तुकाराम महाराजांनी क्षुद्र देवी-देवता व त्यांची पूजा करणार्यांची निंदा केली आहे।

    (१)- नव्हे जाखाई जोखाई। मायराणी मेसाबाई॥१॥

    बळिया माझा पंढरीराव। जो या देवांचा ही देव॥२॥

    रंडी चंडी शक्ती। मद्यमांसाते भक्षिती॥३॥

    बहिराव खंडेराव। रोटीसुटीसाठी देव॥४॥

    गणोबा विक्राळ। लाडुमोदकांचा काळ॥५॥

    मुंजा म्हैसासुरे। हे तो कोण लेखी पोरे॥६॥

    वेताळे फेताळे। जळो त्यांचे तोंड काळे॥७॥

    तुका म्हणे चित्ती। धरा रखुमाईचा पती॥८॥ (१६२४)

     

    जाखाई, जोखाइ, मायराणी, मेसाबाई ह्या क्षुद्र देवता आहेत। खरा देव नाही। माझा पंढरीनाथ विठोबा (ओम्) हा सर्वशक्तिमान असून तो ह्या देवांचा ही देव आहे। रंडी, चंडी, ह्या शक्ती मद्य मांसाचे भक्षण करणार्या आहेत। खंडोबा, बहिरोबा, हे तर भरीत-रोडग्याचे देव आहेत। मोठ्या देहाचे गणपतीबाप्पा हे लाडूमोदकांचे काळ आहेत। मुंजाबा, म्हैसासुरादि हे तर पोरात जमा आहेत, ह्यांना कोण विचारतो? वेताळ, फेताळादि ह्या काळतोंड्यांचे तोंड जळो। तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आपल्या चित्तात एका पांडुरंगाला ठेवा। तुम्ही फक्त एका विठ्ठलाची [सर्वत्र व्याप्त ईश्वराची] भक्ती करा॥८॥

    क्रमशः

    डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे
    रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
    नांदगाव, जि. नाशिक
    मो. ९८२२४२८५७२

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

    September 22, 2026

    इस्कॉन जळगावतर्फे ४ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव

    August 23, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif