संस्कृत महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व सम्मेलनाचे आयोजन

0

 

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

फैजपूर येथील सेवाभावी श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ तथा संस्कृत शास्त्री सम्मेलन दि १८ व १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भारतातून महानुभाव पंथाचे पाचशे संत उपस्थित राहणार असल्याची माहिती आचार्य मानेकर शास्त्री यांनी दिली. फैजपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाची फैजपूर येथे सन १९६१ साली झाली. हे महाविद्यालय ६२ वर्षांपासून अस्तित्वात असून दोनशे शास्त्री यांनी संस्कृत शास्त्री पदवी नागपूर विद्यापीठ अंतर्गत प्राप्त केली आहे. आता श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय फैजपूर या नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ तथा संस्कृत शास्त्री संमेलन दि १८/१९ मार्च २०२३ रोजी संपन्न होणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाला भारतभरातून पाचशे महानुभाव पंथाचे पाचशे संत उपस्थित राहणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य विंदवांस बाबा शास्त्री फलटण हे राहणार आहे. तर आचार्य बाभुलगावकर बाबा शास्त्री करमाड, आचार्य खामणीकर बाबा कनाशी, आचार्य नागराजबाबा शास्त्री औरंगाबाद, आचार्य राहेरकर, आचार्य.संतोषमुनी शास्त्री औरंगाबाद, आचार्य रिधपूरकर शास्त्री, श्री.आचार्य प्रवर न्यायबास, श्री.आचार्य प्रवर माहूरकर हे उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी नूतन इमारत उद्घाटन सुशील के बाफना (जळगांव) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.