रेखा झुनझुनवाला, संकरा आय फ़ाऊंडेशन, इंडियाच्या विश्वस्त मंडळात सामील

0

लोकशाही विशेष लेख

 

स्टॉक मार्केटचे दिग्गज, गुंतवणूकदार आणि परोपकारी व्यक्तीमत्वं असलेल्या दिवंगत राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची पत्नी रेखा झुनझुनवाला संकरा आय फ़ाऊंडेशन, इंडिया (SEFI) च्या विश्वस्त मंडळात सामील झाल्या आहेत. रेखा या आपल्या दिवंगत पतीचे कार्य पुढे नेणार आहेत. जे पुर्वी SEFI बरोबर करत होते. त्यांच्या सेवाभाव उपक्रमांमध्ये आरोग्यसेवा आणि शिक्षणावर भर दिला जाणार असून या क्षेत्रांमधील बऱ्याच संस्थांना त्या मदत करणार आहेत. डॉ.रामाणी यांच्या उपलब्धी आणि SEFI तसेच श्री कांची कामकोटी मेडिकल ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील आपल्या सहभागाबद्दल बोलताना, रेखा झुनझुनवाला म्हणाल्या, “ मला अध्यक्ष श्री. एस.व्ही बालसुब्रमण्यम आणि व्यवस्थापकिय ट्रस्टी असलेले पद्मश्री डॉ. आर.व्ही रामाणी यांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांनीच मला विश्वस्त मंडळातील एक सदस्य म्हणून गोर-गरिबांना मदत करण्याची संधी दिली.

1977 साली डॉ. रामाणी यांनी गरिबांना मदत करण्याच्या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला सुरवात केली. मला हे सांगताना अतीशय आनंद होतो आहे की फ़ाऊंडेशनची देशभरात 13 नेत्र रूग्णालये असून या रूग्णालयांमार्फ़त गरजूंना जागतिक दर्जाचे उपचार दिले जातात. फ़ाऊंडेशन द्वारे यापुर्वीच 22 लाख मोफ़त शस्त्रक्रिया करून झाल्या असून येत्या वर्षभरात अजून 2.5 लाख मोफ़त शस्त्रक्रिया करण्याचा आमचा मानस आहे. यापेक्षा अधिक चांगला दृष्टीकोन असूच शकत नाही आणि म्हणून मला SEFI आणि डॉ. रामाणी यांना असेच यश मिळत राहण्याकरिता शुभेच्छा द्यायच्या आहेत.”

डॉ. रामाणी यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून त्यांनी दृष्टी सारखी अनमोल भेट उच्च गुणवत्तेसह, परवडणाऱ्या किमतीत आणि भारताच्या ग्रामीण भागांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होऊ शकणाऱ्या नेत्रचिकितसेमार्फ़त देण्याचे ठरविले आहे. शाळकरी मुलांकरिता प्रतिबंधात्मक नेत्रचिकित्सा उपक्रम “रेन्बो (इन्द्रधनुष्य)’, नवजात शिशुंकरिता प्रतिबंधात्मक नेत्रचिकित्सा उपक्रम “स्वागतम” आणि बऱ्या न होणाऱ्या आजारांमुळे आलेल्या अंधत्वाकरिता पुनर्वसन उपक्रम “मैत्री”. “व्हिजन केअर टेक्नीशीयन ट्रेनिंग” हा एक नेत्रचिकित्सा अभ्यासक्रम आहे ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल समाजातील तरूण महिलांचे सबलीकरण करता येऊ शकेल.

संकलन –संयोजन
सुबोध रणशेवरे
संपर्क -९८३३१४६३५६
इमेल – http://subodh.ranshevre @rediffmail.com

Leave A Reply

Your email address will not be published.