मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना समन्स पाठवले आहे. चार दिवसांपूर्वी ईडीने (Ed) याच प्रकणात संजय राऊतांना अटक केली होती (Sanjay Raut Arrested). पत्राचाळ प्रकरणात (Patra Chawl Case) वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर त्यांना ईडीने हे समन्स बजावले आहे.
ED summons Sanjay Raut's wife Varsha Raut in the Patra Chawl land case money laundering case. Summons issued after transactions done on Varsha Raut's account came to light: ED pic.twitter.com/8cUyE7Bcao
— ANI (@ANI) August 4, 2022
वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यामुळे आता त्यांना ईडी समोर हजर राहून त्यांची बाजू मांडावी लागेल. वर्षा राऊत यांना उद्या (5 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश समन्सद्वारे देण्यात आले आहेत.
ईडीच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात वर्षा राऊत यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्यासंदर्भात भाष्य केले होते. ईडीने राऊत यांच्या घरावर छापे टाकले तेव्हा काही कागदपत्रे सापडली होती. त्यानंतर संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना रक्कम पाठवली गेली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आज ईडीने वर्षा राऊत यांना समन्स पाठवले आहे.
संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी – शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांना आज कोर्टासमोर हजर ( Sanjay Raut case hearing ) केले असता पुन्हा 8 ऑगस्टपर्यंत ईडी कस्टडी ( Sanjay Raut Ed custody) देण्यात आली आहे. गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यामुळे आणखी संजय राऊत यांचा मुक्काम ईडी कोठडीत वाढला आहे.