Tuesday, May 24, 2022

मोठी बातमी.. संजय राऊत यांची संपत्ती जप्त; ED ची मोठी कारवाई

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त केल्याची माहिती मिळत आहे. आलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

प्रवीण राऊत पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप असून हा सर्व घोटाळा १ हजार ३४ कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळ घोट्याळ्यातील पैशाचा वापर अलिबागमधल्या जमिनी खरेदीमध्ये करण्यात आला होता, असं प्रवीण राऊत यांच्या चौकशीतून समोर आलं होतं.

या जमिनीची खरेदी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावावर करण्यात आल्या होत्या. साठ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा हा व्यवहार होता.

अतिशय कमी दरात आणि मुळ जमीन मालकांना धमकावून या जमिनी घेण्यात आल्या होत्या असं ईडीच्या चार्जशिटमध्ये नमुद करण्यात आलं आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या