Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती
    महाराष्ट्र

    लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 12, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    ट्रम्प असो किंवा पुतीन यांना लक्ष घालण्याची गरज नाही. सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही. ते त्यांच्या गावचे पाटील आणि आम्ही आमच्या गावचे पाटील. पण मोदी सरकाने जी बोटचेपी भूमिका घेतली आहे त्यामुळे ट्रम्प भारतामध्ये घुसले आहेत. हे देशाच्या सार्वभौमत्वाचे दुर्देव्य आहे. हा सौदा काय झालाय हे भविष्यामध्ये समजेल, कोणावरचे खटले काढून घेतले जातायेत किंवा अजून कोणाला काही कळते, काही काम उद्योगपतींना मिळते. काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटतेय या गोष्टी हळूहळू उघड होतील. भारत आणि अमेरिकेमध्ये सौदा काय झाला हे भारताला समजणे गरजेचे आहे. भारताच्या आंतरबाबीमध्ये ट्रम्प यांनी नाक खुपसणे म्हणजे हा आमच्या स्वातंत्र्याचा, संसदेचा, सार्वभौमत्त्वाचा अपमान आहे. मिस्टर मोदी संसदेचे अधिवेशन घ्यायला तयार नाहीत पण देशातील प्रत्येक घडामोडींची माहिती ट्रम्प यांना दिली जाते आणि त्यांच्याकडून सूचना येतात हा संसदेचा अपमान असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    देशात अंतर्गत झालेल्या हल्ल्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. युद्धात सैन्य पुढे गेले त्यांचे पाय खेचण्याचे काम कोणी केले असेल आणि ट्रम्पला घुसवले त्याला जबाबदार परराष्ट्र धोरण आणि प्रधानमंत्री कार्यालय आहे. तुम्ही लाहोर आणि कराचीवरती तिरंगा फडकावण्याची घोषणा केली होती. तिथे आमच्याविरूद्ध विजयाचे मोर्चे निघत आहेत, हे भारतीय म्हणून दु:ख होणारच, युद्ध विरामाची घोषणा होण्याआधीच ट्रम्प यांनी ट्विटरवरून सांगतात हा सर्वात मोठा घोटाळा आहे. देशाला माहित नाही, देशाच्या प्रमुख नेतृत्त्वाला माहित नाही, कदाचित डिफेन्स मिनिस्टरला माहिती नसेल, किती लोकांना कोणत्या पद्धतीने अंधारात ठेवले आहे हे उघड होत आहे. हा पडद्यामागे अंधारात काय सौदा झाला हे समजायला हवे, त्यासाठी विशेष अधिवेशन पाहिजे, असे राऊत म्हणाले.

    Sanjay Raut
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif