Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»शिंदेसेनेला कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही..
    महाराष्ट्र

    शिंदेसेनेला कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही..

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 29, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावरून अजूनही वातावरण तापले आहे. त्यातच उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी कॉमेडियन कुणाल कामराशी संवाद साधत शिंदेसेनेला डिचवले आहे.आज सकाळी घेतलेल्या पत्र परिषदेत त्यांनी शिंदे सेनेवर टीका केली.

    कुणाल कामरा याच्याशी कालच बोलल्याचे राऊत म्हणाले. सध्याच्या परिस्थितीवर बोलताना, आपण कायद्याला सामोरं जायला हवं, असा सल्ला राऊतांनी कामरा याला दिला. कुणाल कामरा याच्याशी संपर्क असल्याबाबत माध्यमांनी विचारणा केली असता, तो अल कायद्याचा सदस्य आहे का? तो देशद्रोही, दहशतवादी, फुटिरतावादी आहे का? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांना काही बोलू द्या, तो असं काही नाही असे ते म्हणाले. तो एक कलाकार आहे.. तो एक कवी आहे. आणि मी त्याला सांगितले आहे की आपण कायद्याला सामोरे जायला हवे.  एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कामरा हा शत्रू वाटतो म्हणून आम्ही त्याच्याशी बोलायचे नाही का? असा सवाल राऊतांनी केला. आम्हालाही वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे या राज्याचे शत्रू आहेत. पण शिंदे गट तर त्यांच्या पायाशी जाऊन बसतो ना, असा चिमटा त्यांनी काढला. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू असे राऊत म्हणाले. सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्यावर हक्कभंग आणला असेल तर त्यांच्या आमदारांचा हक्क आहे. त्यावर आम्ही उत्तर देऊ असे ते म्हणाले.

    कुणाल कामरा अथवा इतर जण हे त्यांचे काम करत आहे. तुमच्यावर टीका केली म्हणून ते देशाचे, राज्याचे शत्रू ठरत नाहीत. तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचे असेल तर त्याच्या पद्धतीत द्या. त्याच्यावर हल्ला करतो, स्टुडिओ तोडतो, ही उत्तर देण्याची पद्धत नाही, अशी चपराक त्यांनी दिली. तर अजित पवारांना हे सगळं मान्य आहे असं दिसत नाही,” असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Sanjay Raut
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!

    November 17, 2026

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif