‘ते’ तर काँग्रेसमध्ये जाणार होते !

संजय राऊतांचा खळबळजनक दावा

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे. एकनाथ शिंदेंबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असेही ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंचा भगव्याशी संबंध नाही. एकनाथ शिंदेंच्या हातात भगवा नाही भाजपचा झेंडा आहे असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडीमात्र संबंध नाही. भाजपाच्या ताटाखालचे मांजर झालेले ते लोक आहेत. त्यांच्या हातात भगवा नाही. ते सगळे भाजपाचे झेंडे आहेत. अजित पवारांच्या हातात भाजपाचा झेंडा आहे, एकनाथ शिंदे यांच्या हातात भाजपाचा झेंडा आहे, त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करु नये, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते या विधानाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘नक्कीच चालले होते. पृथ्वीराज चव्हाण यांना एकदा विचारा, त्यांची मुलाखत घ्या. आज अहमद पटेल नाही आहेत, त्यामुळे फार चर्चा करायची नाही. व्यक्ती साक्ष देण्यास उपलब्ध नाही अन्यथा अहमद पटेल यांची दिल्लीत पहाटे दिल्लीत कोणाशी चर्चा झाल्या होत्या हे सर्वात जास्त मला माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.