नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांचा पहिलाच नाशिक दौरा आहे. संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिकमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं मंथन करण्यात आले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलही चर्चा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटासह भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळेच पक्षाच्या डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत मैदानात उतरले आहेत.
यानंतर संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना टोला लगावला आहे. “बाळासाहेब ठाकरे जेव्हा नेतृत्व करत होते, तेव्हाही आम्ही अशा प्रसंगातून गेलो आहेत. आम्ही अनेक पराभव पचवले आहेत. पण पक्ष उभा ठेवला. पक्ष आजही मजबुतीने उभा आहे. काही लोक मोह माया लोभ लाभ यासाठी जात आहेत. रोज बातम्या येतात. पण जिथे जातात ती खरी शिवसेना नाही. पण मोह कोणाला सुटला नाही, अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलो आहोत. विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपला असे होत नाही. राजकारणात कोणीही संपत नाही, असे संजय राऊत म्हणाले.
विधानसभा नंतर पहिल्यांदा आलो असलो तरी पदाधिकारी नेहमी मुंबईला येत होते. मातोश्रीवर बैठक झाली, त्यावेळी हे नेते आले होते. सरकारने निवडणूक घ्यायची हिंमत दाखवली तर नाशिकच्या महानगरपालिका निवडणूक होईल. ईव्हीएम सेट करून जे निवडून आले ते धक्क्यातून सावरले नाही. आमचं सोडून द्या. विजय वीर सावरले की निवडणूक लागतील. पक्षात काही बदल नक्कीच होणार आहेत. फक्त नाशिक मध्ये नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बदल होणार आहेत. अनेक नवीन कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहेत. काही लोक मोह माया लोभ लाभ यासाठी जात आहेत. रोज बातम्या येतात. पण जिथे जातात ती खरी शिवसेना नाही. पण मोह कोणाला सुटला नाही, अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलो आहेत. बाळासाहेब ठाकरे जेव्हा नेतृत्व करत होते, तेव्हाही आम्ही अशा प्रसंगातून गेलो आहेत. आम्ही अनेक पराभव पचवले आहेत. पण पक्ष उभा ठेवला. पक्ष आजही मजबुतीने उभा आहे. विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपला असे होत नाही. राजकारणात कोणीही संपत नाही. चंद्राबाबूंचे फक्त १६ आमदार आले असले तरी ते सत्तेत आहेत, हे लक्षात घ्या. आज लोकशाहीत कटेंगे तो बटेंगे, मोदी हे तो सेफ हे, असं सर्व सुरु आहे. पण पुढच्या वर्षभरात काय नवीन प्रकरण येतील आणि बटगें कटेंगे म्हणणारे स्वत:च काटले जातील, याचा राजकारणात भरोसा नसतो”, असेही संजय राऊतांनी म्हटले.
ज्यांना जायचे ते गेले, ते सत्तेच्या मोहापायी गेले. ज्यांना जायचं त्यांची आम्ही मनधरणी करत बसले नाहीत. उत्तमराव जानकर हे दिल्लीत आहे. ते ईव्हीएम विरुद्ध निवडणूक आयोगाची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे प्रचंड पुरावे आहेत. पूर्वी बूथ कॅप्चरिंग करायचे. आता ईव्हीएमच्या माध्यमातून बूथ ताब्यात घेण्यात आले. याचे सर्व पुरावे घेऊन उत्तमराव जानकर हे दिल्लीत गेले. पण त्यांना निवडणूक आयोग भेटत नाही”, असा आरोप संजय राऊतांनी केला.
मुंबई बाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली. 14 महानगर पालिका आहेत. नाशिकमध्ये स्वबळावर लढण्याचं ठरलेलं नाही. आम्ही कोअर कमिटी स्थापन केली आहे. आघाडीतून लढलं पाहिजे. मुंबईत मात्र वेगळं राहिल हे जाहीर केलं आहे. चंद्राबाबू यांनी पक्ष फोडला नव्हता. एकनाथ शिंदे भाजपचा निकाल संशयास्पद होता. अजित पवारांचाही निकाल संशयास्पद होता. निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून पक्ष ताब्यात घेतला. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष ताब्यात दिला नाही. अमित शाह यांचा फोटो एकनाथ शिंदेंनी लावायला हवा. कारण अमित शाहा हे त्यांचे दैवत आहेत. अमित शाहांनीच हे सर्व कांड केलं. अमित शाह आणि मोदी काय अमृत पिऊन आले नाही, अशा शब्दात संजय राऊतांनी ताशेरे ओढले.