मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेला आहे असे मी मानतो. एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख नाही किंवा शिवसेनाप्रमुखांचे वारसदार नाही. एकनाथ शिंदे हे ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळून गेलेले जयचंद आहेत. आपली कातडी वाचवण्यासाठी ज्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचं ठरवलं आहे. तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे, त्या पैशाच्या माध्यमातून संस्था विकत घेणे त्यातून निवडणुका जिंकणे याला राजकारण म्हणत असाल तर अशा प्रकारच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरे वेश्येचे राजकारण म्हणायचे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदेचे प्रकरण गांभीर्याने घेऊ नये, त्यांनी पालकमंत्रपदाचा वाद सोडवावा. काल मुख्यमंत्री होते, स्वत: ते उपमुख्यमंत्री आहेत, आता तेही राहणार नाहीत. महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय तो त्यांच्याच पक्षातील आहे, याचा त्यांनी विचार करावा. मी नाव घेत नाही, घडामोडी पडद्यामागे सुरू आहेत. राज्याला भविष्यात तीन मुख्यमंत्री मिळू शकतील अशी परिस्थिती आहे. याचे वजन कुठे होते. सायकलच्या टायरमध्ये हवा भरतात ना तसे हे अमित शहांनी हवा भरलेले नेते आहेत. बाळासाहेबांनी यांना भरपूर दिले, तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती. आता काय आहे?, असे म्हणत संजय राऊतांनी थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.