खा. संजय राऊत यांच्या अशोभनीय कृत्याचा पाचोऱ्यात निषेध

0

पाचोरा ;– खा. संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी खा. श्रीकांत शिंदे यांचे पत्रकार परिषदेत नाव घेताच खा. संजय राऊत यांनी केलेल्या अशोभनीय कृत्याचा पाचोरा शिवसेनेतर्फे (शिंदे गट) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहिर निषेध करण्यात आला. खा. संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक फलकास जोडे मारत व त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

याप्रसंगी आ. किशोर पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, खा. संजय राऊत यांनी सुरु केलेला मिडिया स्टंट थांबवावा. खा. राऊत यांनी केलेल्या अशोभनीय कृत्याबद्दल त्यांच्या प्रतिकात्मक फलकास जोडे मारुन निषेध करण्यापेक्षा राऊत यांना समक्ष जोडे मारावे. खा. संजय राऊत यांनी मिडियाच्या माध्यमातून चालविलेला अशोभनीय प्रकार थांबविला नाही तर त्यांच्या फलकास जोडे न मारता समक्ष जावुन जोडे मारण्यात येतील असा इशार ही आ. किशोर पाटील यांनी दिला आहे.

जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी सांगितले की, खा. संजय राऊत यांनी केलेल्या कृत्याचा जिल्हाप्रमुख या नात्याने मी जिल्ह्याच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करत असुन हा प्रकार राजकारणाला अशोभनीय आहे. खा. राऊत यांनी चौकटीत राहून काम करावं अन्यथा आम्हाला समक्ष येवुन जोडे मारावे लागतील. याप्रसंगी आ. किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मा. नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, वाल्मिक पाटील, बापु हटकर, मा. पंचायत समिती सभापती सिकंदर तडवी, जितु पाटील, जय बारावकर, प्रविण वाघ, सुमित सावंत, सुरज शिंदे, लक्ष्मण शिंदे, अनिल राजपुत, राहुल महाजन यांचेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खा. संजय राऊत यांच्या निषेधार्थ घोषणाबाजीनी परिसर दणाणून सोडला होता.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.