Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»शरद पवारांचा फोटो वापरणे बाबत संजय पवारांची खेळी यशस्वी!
    संपादकीय

    शरद पवारांचा फोटो वापरणे बाबत संजय पवारांची खेळी यशस्वी!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 14, 2026No Comments408 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो त्यांच्या जाहिरातीमध्ये व इतर ठिकाणी वापरणे बाबत खुद्द शरद पवारांची परवानगी घेतली.

    यावेळी शरद पवारांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, माझे वडील मुरलीधर अण्णा पवार आणि तुमची 1970 पासूनची मैत्री होती. त्यामुळे तुमच्याविषयी माझ्या मनात एक प्रकारचा जिव्हाळा आहे. त्यासाठी मी जरी अजित पवार गटाचा असलो तरी माझ्या जाहिरातींमध्ये आणि इतर ठिकाणी तुमचा फोटो वापरण्याची परवानगी मला द्यावी, असे पत्र माननीय शरद पवार यांना संजय पवार यांनी लिहिले होते.

    त्यासाठी मला तुमचा वेळ हवा आहे, असे पत्र लिहिल्यानंतर शरद पवार यांनी 11 जून 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजेची वेळ त्यांना दिली. वास्तविक पाहता, 10 जून रोजी अजित पवार गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त कार्यक्रम होता, पण तो कार्यक्रम 10 ऐवजी 11 जूनला ठेवण्यात आला होता. तरी 11 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता संजय पवार हे शरद पवारांकडे पोहोचले. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांचे लिहिलेले पत्र पूर्ण वाचून काढले आणि त्यानंतर संजय पवारांना फोटो वापरण्यास परवानगी दिली.

    आता हा फोटो वापरण्यास परवानगी दिल्यानंतर वेगळाच वाद सुरू झाला आहे. तो अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल भाईदास पाटील यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. आपल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचा फोटो कशासाठी वापरायचा, असा प्रश्न अनिल भाईदास पाटील व इतर काही नेत्यांनी व्यक्त केला आहे.

    त्यावर संजय पवार यांचे म्हणणे असे आहे की, मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष असलो तरी माझी शरद पवारांवर गाढ श्रद्धा आहे. म्हणून मी वैयक्तिक दृष्ट्या तो फोटो वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापुढे जाऊन संजय पवार म्हणतात की, यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. ते शरद पवारांचे गुरु होते. शरद पवार यांनीसुद्धा अजित पवार हे आपले गुरुच मानले. त्यामुळे एकमेकांचे गुरुस्थानी असलेल्या नेत्यांचे फोटो जर मी वापरले, तर त्यात माझे काही चुकले का?

    राजकारण करण्यासाठी वेगळ्या जागा आहेत. त्या ठिकाणी राजकारण करता येते. जेव्हा अशा नाजूक प्रसंगी राजकारण करण्याचे काय कारण, असा प्रश्न उपस्थित करून संजय पवार यांनी म्हटले आहे की, सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या नातेवाईक आहेत. त्या त्यांना आपल्या गुरुस्थानीच मानतात. त्यामुळे शरद पवार यांचा फोटो वापरणे हे मला काही चुकीचे वाटत नाही. त्याउपर माझ्या पक्षातील नेत्यांनी मला काही जण विचारतील, तर मी असे उत्तर द्यायला तयार आहे. उगाच दोन गटांची फाळणी झाल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या जाहिरातीमध्ये फोटो वापरायचा होता, तेव्हा तो वापरू दिला नाही म्हणून त्याचा दुसरा करीत बसणे हे योग्य नाही.

    त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. पक्षात फूट झाल्यानंतर एकमेकांच्या मनात एक प्रकारचा राग असतो. तो राग शांत झाल्याशिवाय काही गोष्टी करणे हे शक्यच नसते. म्हणून त्याचाच गलबला करीत बसण्यापेक्षा मधला मार्ग काढणे आवश्यक आहे. माझ्या जाहिरातींमध्ये आणि इतर ठिकाणी फोटो वापरण्याचा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. जोपर्यंत शरद पवारांवर माझी श्रद्धा आहे, तोपर्यंत ते राहणार आहे. त्यामुळे मला कोणी शरद पवारांचा फोटो वापरण्यापासून बंदी घालू शकत नाही. खुद्द पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मनातसुद्धा शरद पवारांविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे माझे कुणीही काहीही करू शकत नाही. मी माझ्या जाहिरातींवर शरद पवारांचा फोटो वापरणार म्हणजे वापरणारच.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!

    September 16, 2026

    गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!

    September 15, 2026

    लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!

    September 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif