Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»संजय गायकवाडांचे आधी वादग्रस्त वक्तव्य नंतर सारवासारव
    राजकारण

    संजय गायकवाडांचे आधी वादग्रस्त वक्तव्य नंतर सारवासारव

    विधानाचा विपर्यास केला : कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर..
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 30, 2026No Comments140 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    “मी संपूर्णपणे शेतकरी कुटुंबातील असून माझे वडीलही हे शेती करायचे त्यामुळे मी शेतकऱ्यांचे संबंधित कधीही वाईट बोलू शकत नाही माझं विधान हे जे लोक अमली पदार्थ घेऊन आपला संसार उघड्यावर टाकतात व आत्महत्या करतात त्यांच्याविषयी मी बोललो होतो या विधानाचा विपर्यास केला व त्यावर वाद निर्माण झाला. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.” अशी सारवासारव संजय गायकवाड यांनी केली.

    विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आहे महायुतीत धुसफुस वगैरे काही नाही. छोट्या मोठ्या गोष्टी सुरूच असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेच्या सध्याच्या शा‍ब्दिक चकमकींवर दिले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं निलंबन करण्याचा प्रस्ताव व तसे आदेश दिले आहेत यावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड फक्त नो कमेंट्स म्हटले.

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या शेतकऱ्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. आज माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला आमदार म्हणून राहण्याचा काहीही अधिकार नाही. ज्या पक्षात ते काम करत आहेत, त्या पक्षातून त्यांचे निलंबन केले पाहिजे. पुढील कारवाई सरकारने केली पाहिजे. सरकारने डिसेंबरच्या अधिवेशनात प्रस्ताव आणून त्यांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तर ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही ते अनेकदा खालच्या भाषेत बोलले आहेत. त्यांच्या शब्दांना मर्यादा नाही. अशांची जीभ छाटली पाहिजे, असे जहाल वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले.

    काय म्हणाले संजय गायकवाड?

    संजय गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्येवर भाष्य केलं. ते म्हणाले की, कधी कधी चिडून एखाद्याला बोलावं लागतं, तुम्ही का मरता? तुम्ही का आत्महत्या करता? तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तर सरकारला चिट्ठी लिहा. आमदाराला किंवा खासदाराला चिठ्ठी लिहा, नाही तर मला तरी कळवा. माझ्यावर असे संकट आहे, असे चिठ्ठीतून सांगा म्हणजे आम्ही सगळे तुम्हाला मदत करू. पण आपला जीव गमवून लेकरांना वारवर सोडून तुम्ही त्यांना एक प्रकारची शिक्षा देत आहात.

    संजय गायकवाड म्हणाले की, ज्या बायकोसोबत सात फेरे घेता, सात जन्माची शपथ घेता, लेकराबाळांना सांभाळण्याची शपथ घेता आणि मध्येच जर तुम्ही आत्महत्या करून जीवन संपवत असाल, तर ते ठीक नाही. मी मागे माझ्या भाषणात बोलायचो की, आत्महत्या जर कोणी केली तर त्याच्या मयताला पण कोणी गेलं नाही पाहिजे. तेव्हा त्याला कळेल की आपली बॉडी कोणीतरी जनावर खातं आणि आपले हाल कसे होतात? हे त्याला कळेल आणि तेव्हा तो आत्महत्या करणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif