
मुक्ताईनगर
मुक्ताईनगर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पहिल्या फेरीत नगरअध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या उमेदवार संजना पाटील २५८३ मतांनी विजयी झाल्या आहे.
मुक्ताईनगर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार संजना पाटील आणि भाजपच्या उमेदवार भावना महाजन यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मुळात या मतदारसंघात उमेदवारांपेक्षा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या वर्चस्वाची खरी लढाई पाहायला मिळणार होती. मात्र आता यात चंद्रकांत पाटलांनी मंत्री रक्षा खडसेंना जोरदार धक्का दिला आहे.

