firestone coupons brake flush lunesta coupons offers christian dollar store coupon wildwater rafting coupons fifty years old gifts birthday nevanac eye drop coupon
Thursday, December 1, 2022

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले; गुन्हा दाखल

- Advertisement -

दहिगाव, यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील स्वतःच्या घराच्या ओट्यावर बसलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून मोटरसायकलीवर अपहरण करणाऱ्या विरुद्ध यावल पोलिसात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सांगवी बुद्रुक येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या घराच्या ओट्यावर सोमवारी सायंकाळी बसलेली असता सांगवी गावातील रोनक राजू तडवी हा मोटारसायकल घेऊन आला आणि तिला कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून पसार झाला असल्याचे निदर्शनास येतात मुलीच्या कुटुंबीयांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेतली.

- Advertisement -

कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादवरून यावल पोलिसात राजू तडवी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानवगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या