सांगोल्यात हृदयद्रावक घटना: आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

0

सांगोल्यात हृदयद्रावक घटना: आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

सांगोला वृत्तसंस्था

सांगोला तालुक्यातील हबिसेवाडी येथे आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सोमवारी (ता. ३) रात्री ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.

चित्रा हणमंत शिंदे (वय २७) ,स्वराज हणमंत शिंदे (वय साडेतीन वर्षे) ,हिंदवी हणमंत शिंदे (वय दीड महिना) (रा. हबिसेवाडी, ता. सांगोला) अशी मृतांची नवे आहेत.

सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार योगेश शहाजी गळवे (रा. हबिसेवाडी, सध्या रा. न्यू पनवेल, नवी मुंबई) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिलेल्या सोमवारी रात्री अचानक चित्रा शिंदे आपल्या दोन मुलांसह घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्री उशिरापर्यंत काहीच माहिती मिळाली नाही. अखेर शेजारील किसन खरात यांच्या विहिरीत सर्वांचे मृतदेह आढळून आले.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले . पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना संपूर्ण गावासाठी हादरवून टाकणारी असून या कुटुंबाने टोकाचे पाऊल का उचलले? याचा शोध पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.