Wednesday, August 10, 2022

भयंकर.. गुप्तधनासाठी 9 जणांची विष पाजून हत्या

- Advertisement -

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पुरोगामी विचारांचा समजला जाणारा महाराष्ट्र एका भयंकर घटनेने हादरला आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात नऊ जणांच्या कथित सामूहिक आत्महत्येच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 20 जून रोजी सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह त्यांच्या घरातून सापडले होते.

- Advertisement -

- Advertisement -

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हे प्रकरण आत्महत्येचे मानले जात होते. मात्र आता याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सांगली सामूहिक आत्महत्या प्रकरणाला एक नवे वळण लागले आहे. याचा खुलासा करताना पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्येचे नसून लपविलेल्या पैशांच्या लोभापायी विष प्राशन करून हत्या केल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीत दोन भावांच्या कुटुंबातील नऊ जण घरात मृतावस्थेत आढळून आले असून, तपासात एका तांत्रिक आणि त्याच्या चालकाने संपूर्ण कुटुंबाला विष पाजून मारल्याचे समोर आले आहे.  पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 20 जून रोजी म्हैसाळ गावात राहणारे दोन्ही भाऊ, त्यापैकी एक शिक्षक आणि दुसरा पशुवैद्यकीय डॉक्टर होता.

दरम्यान प्राथमिक तपासात कर्जबाजारीपणामुळे ही आत्महत्या असल्याचे समजते. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी सांगितले की, या घटनेत तांत्रिक आणि त्याच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. या दोघांनी कुटुंबातील नऊ जणांना विष पाजून ठार केल्याचा आरोप आहे. यापूर्वी या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली होती. दोन्ही कुटुंबातील भाऊ आरोपींच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या