Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट वूमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
    जळगाव

    जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट वूमन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

    मुख्य राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत दुहेरी नियुक्तीची घोषणा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 26, 2026Updated:April 26, 2026No Comments218 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ही देशातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली व्यापारी संघटना असून, देशभरातील कोट्यवधी व्यापारी व ४०,००० हून अधिक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व करते. व्यापाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, धोरणात्मक प्रतिनिधित्व आणि व्यापारवृद्धीसाठी कार्य करणारी ही राष्ट्रीय संघटना आहे.

    कॅट आयोजित राष्ट्रीय महिला उद्योजक शिखर परिषद नुकतीच नवी दिल्ली येथील हिंदी भवनमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परिषदेत जळगावच्या संगीता पाटील यांनी कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. तसेच त्यांची मुख्य राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. कॅट च्या इतिहासात प्रथमच एका व्यक्तीकडे राष्ट्रीय स्तरावर दोन महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने हा निर्णय विशेष ठरला आहे.

    दिल्लीच्या माननीय मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत तसेच कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि कॅटचे महामंत्री व खासदार प्रविण खंडेलवाल यांच्या दूरदर्शी मार्गदर्शन व प्रभावी नेतृत्वाखाली ही परिषद अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी आणि उल्लेखनीयरीत्या पार पडली.

    या परिषदेत देशातील विविध राज्यांमधून ४०० हून अधिक महिला उद्योजक सहभागी झाल्या. महिला उद्योजकता, फायनान्स, स्किल डेव्हलपमेंट, डिजिटल सक्षमता, MSME क्षेत्रातील संधी, स्टार्टअप्स व बाजारपेठ उपलब्धता या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

    संगीता पाटील यांचा जळगाव जिल्ह्यापासून महाराष्ट्र राज्य आणि पुढे राष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. विविध संस्थांमध्ये विविध पदांवर कार्य करत त्यांनी सातत्यपूर्ण, परिणामकारक आणि समाजाभिमुख कार्याचा ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास आणि स्वावलंबनाच्या दिशेनेही त्यांनी प्रभावी कार्य केले आहे.

    महिलांनी उद्योग-व्यवसायात सक्रिय नेतृत्व घ्यावे

    आपल्या प्रभावी अध्यक्षीय भाषणात संगीता पाटील यांनी महिला उद्योजकांना संबोधित करत सांगितले की, महिलांमध्ये क्षमता, कौशल्य आणि जिद्दीची कोणतीही कमतरता नाही; त्यांना केवळ योग्य व्यासपीठ आणि संधी मिळणे आवश्यक आहे. कॅट विमेन विंग देशभरातील महिला उद्योजकांना एकत्र आणून सशक्त, संघटित आणि प्रभावी नेटवर्क निर्माण करून महिलांसाठी एक सक्षम व्यासपीठ ठरणार आहे.

     “आत्मनिर्भर भारत” आणि “वोकल फॉर लोकल” या संकल्पनांना पुढे नेण्यासाठी महिलांनी उद्योग-व्यवसायात सक्रिय नेतृत्व घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. स्किल डेव्हलपमेंट, डिजिटल सक्षमता आणि मार्केट लिंकजच्या माध्यमातून महिलांना लोकल ते ग्लोबल बाजारपेठेशी जोडण्यावर विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी त्यांनी अधोरेखित केले की, देशाच्या लोकसंख्येतील जवळपास ५० टक्के महिला असूनही अर्थव्यवस्थेतील त्यांचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी आहे आणि तो वाढवणे ही राष्ट्रीय गरज आहे.

    परिषदेत आदरणीय प्रविणजी खंडेलवाल यांनी कॅट विमेन विंग च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संगीता पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर संगीता पाटील यांनी कॅट विमेन विंगची नवीन संघटनात्मक रचना जाहीर केली, ज्यामध्ये २५ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी तसेच १५ विभागीय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली. या नव्या नेतृत्वासह उभ्या राहिलेल्या संघटनात्मक बळामुळे देशातील महिला उद्योजकतेला नवचैतन्य मिळणार असून, तिचा प्रभाव राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात अधिक ठळकपणे जाणवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

    दोन दिवसीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी कॅट विमेन विंग चे सर्व पदाधिकारी तसेच कॅट दिल्ली कार्यालयातील संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वय, नियोजन आणि समर्पित कार्यामुळे हा भव्य राष्ट्रीय कार्यक्रम अत्यंत सुव्यवस्थित आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026

    ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif