Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    गुन्हे वार्ता

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    विशेष टास्क फोर्सची धडाकेबाज कारवाई; 4 डंपर जप्त
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 11, 2026No Comments191 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा

    अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पाचोरा तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार विजय बनसोडे यांनी आखलेल्या प्रभावी रोडमॅपनुसार दि. 10 जून रोजी रात्रीच्या सुमारास विशेष टास्क फोर्सने मौजे डोकलखेडा येथून अवैध वाळूची वाहतूक करणारे जळगाव येथील चार डंपर जप्त केले. या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

    ही मोहीम अत्यंत गोपनीयता आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. महसूल व पोलीस प्रशासनाच्या 23 सदस्यांच्या संयुक्त पथकाने समन्वयाने काम करत संबंधित डंपर ताब्यात घेतले आणि ते पाचोरा तहसील कार्यालयात जमा केले. पाचोरा प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे तहसील कार्यालय परिसर आणि शासकीय रुग्णालयालगतचे कंपाउंड जप्त वाहनांनी अक्षरशः भरून गेले आहे.

    या विशेष मोहिमेत टास्क फोर्स क्रमांक 1 व 2 च्या पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मंडळ अधिकारी आर. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहुल पवार, नकुल काळकर, राजेंद्र शिरसाठ, अविनाश जंजाळे, दीपक दवंगे, शिवाजी डोंगरे यांच्यासह इतर महसूल कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. तसेच, पोलीस विभागाचे ब. दु. सिंग बंजारा, हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख व अशोक पाटील यांचेही सहकार्य लाभले. अवैध वाळू उपशामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत होते, त्याला या कारवाईमुळे चाप बसला आहे. नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन आणि शासकीय महसुलाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, भविष्यातही अशा कठोर कारवाया सुरूच राहतील, असा स्पष्ट इशारा तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026

    रस्त्यावर मृत अर्भक आढळल्याने जळगावात खळबळ

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif