सॅमसंगचे 2 स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

तुम्हाला नवीन आणि खिशाला परवडेल असा स्वस्त स्मार्टफोन घ्यायचा आहे का ? तर ही बातमी नक्की वाचा. कारण तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सॅमसंगने खिशाला परवडणारे 2 स्मार्टफोन लाँच केले आहेत. Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04e असे हे दोन स्मार्टफोन आहेत. सॅमसंगने यात जबरदस्त फीचर्स दिली आहेत. 20 डिसेंबर म्हणजे आजपासून ग्राहकांना हे स्मार्टफोन खरेदी करणार आहेत. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअरवरून 20 डिसेंबरपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. जाणून घेऊया या दोन्ही स्मार्टफोनची किंमत आणि भन्नाट फीचर्स..

Samsung Galaxy A04

किंमत आणि कलर

सॅमसंगचा हा स्मार्टफोन ग्रीन, कॉपर आणि ब्लॅक कलरमध्ये लाँच केला आहे. 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज आहे. किंमत 12,999 रुपये आहे, तर फोनच्या 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजची किंमत 11,999 रुपये इतकी आहे.

फीचर्स आणि कॅमेरा

यामध्ये 6.5-इंच एचडी प्लस डिस्प्लेसाठी सपोर्ट आहे. फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट उपलब्ध आहे. तर सुरक्षेसाठी फेस रेकग्निशन आणि फास्ट डिव्हाईस अनलॉक सपोर्ट कंपनीने दिला आहे. ड्युअल 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप सपोर्ट आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर 5,000 mAh बॅटरी आणि टाइप-सी फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Samsung Galaxy A04e

किंमत आणि कलर

हा स्मार्टफोन लाइट ब्लू आणि कॉपर कलरमध्ये उपलब्ध आहे. 3 GB RAM सह 32 GB स्टोरेज स्मार्टफोनची किंमत 9,299 रुपये, 3 GB RAM सह 64 GB स्टोरेज स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. तर 4 GB RAM सह 128 GB स्टोरेज स्मार्टफोनची किंमत 11,499 रुपये इतकी आहे.

फीचर्स आणि कॅमेरा

यामध्ये 6.5-इंच एचडी प्लस डिस्प्लेसाठी सपोर्ट तर MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट उपलब्ध आहे. त्याशिवाय ड्युअल 13 मेगापिक्सल कॅमेरा सेटअप दिला असून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा कंपनीने दिला आहे. सुरक्षिततेसाठी फेस रेकग्निशन आणि फास्ट डिव्हाईस अनलॉक सपोर्ट कंपनीने दिले आहे. 5,000 mAh बॅटरी आणि टाइप-सी फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. यामध्ये AI पॉवर मॅनेजमेंट सिस्टम दिली आहे, त्यामुळे फोनला 3 दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.