समीर वानखेडे राजकारणाच्या मैदानात उतरणार

‘या’ पक्षाकडून तिकीट मिळणार : विधानसभा लढणार

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

कुणाला कधी राजकारणाची ओढ लागेल हे सांगता येत नाही. नुकताच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अश्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका अधिकाऱ्याच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे समीर वानखेडे. डॅशिंग IRS अधिकारी समीर वानखेडे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

तीन वर्षांपूर्वी समीर वानखेडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलं होतं. समीर वानखेडे यांनी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीच सरकार होतं. समीर वानखेडे यांच्यावर त्यावेळी अनेक आरोप सुद्धा झाले होते. हेच समीर वानखेडे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी समीर वानखेडे यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल.

 

समीर वानखेडे मुंबईच्या धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ते निवडणूक रिंगणात उतरु शकतात. या संदर्भात त्यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत बोलणी फायनल झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हाय प्रोफाइल IRS अधिकारी समीर वानखेडे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करु शकतात. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा अशी तीन पक्षांची मिळून महायुती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.