Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    • शाश्वत शेतीचा ‘स्वामीनाथन मार्ग’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जमीन वादातून समाजवादी पक्षाच्या नेत्याची हत्या
    गुन्हे वार्ता

    जमीन वादातून समाजवादी पक्षाच्या नेत्याची हत्या

    मारहाणीत मृत्यू, मुलगा जखमी : राजकीय वर्तुळात खळबळ
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 21, 2026No Comments195 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली असून समाजवादी पक्षाचे नेते सेनापती कुंतल यांचा मारहाणीत मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना रिफायनरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनी कुंतल आणि त्यांच्या मुलावर हल्ला केला, ज्यात दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी बाप-लेकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सेनापती कुंतल यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा सध्या उपचार घेत आहे.

    या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी धाडी टाकल्या. याच दरम्यान पोलिस आणि आरोपींमध्ये चकमक झाली. या चकमकीत मुख्य आरोपी योगेंद्र पहलवान याच्या दोन्ही पायांवर गोळी लागली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच दुसरा आरोपी समय सिंग यालाही घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे.

    पोलिसांनी आरोपींकडून एक कार, लोखंडी रॉड, दोन देशी बनावटीची पिस्तुलं, तसेच जिवंत आणि वापरलेल्या काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर आरोपींचा सहभाग याबाबत पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif