जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आजच्या युवकांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता हा देशा समोर सर्वात मोठा चिंतेचा विषय असुन व्यसनमुक्त समाज व नशा मुक्त भारत करण्यासाठी सर्व स्तरातून संघटीत प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले. सामाजिक न्याय दिवस व नशा मुक्त भारत जनजागृती पधंरवाडा समारोप प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून युवकां समोर त्यांनी आपले विचार मांडले.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथे राजर्षी छ शाहू महाराज जंयती सामाजिक न्याय दिवस व नशा मुक्त भारत अभियानअंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचा प्रारंभ राजर्षी छ शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय पाटील, समाज कल्याण निरीक्षक रवींद्र बारी, समाज कल्याण लेखाधिकारी राजेंद्र पाटील, नशा मुक्त भारत अभियाना चे समन्वयक प्रमोद मोरे, प्रशिक्षण संस्थेचे गट निदेशक लोकेश धांडे, नितीन चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी संदिप उगले, समाज कल्याण विभागाचे विनायक बाविस्कर, दिपक महाजन आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती सोबतच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची महीती उपस्थित युवकांना दिली. दरम्यान दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने “नशा करी दुर्दशा” हे पथनाट्य सादर करण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि 12 ते 26 जून नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती पंधरवडा आयोजित करण्यात आला. या पंधरवड्यात पथनाट्य, चर्चा सत्र, जनजागृती रँली आदि विविध कार्यक्रमांचे आयोजन सामाजिक न्याय विभाच्या वतीने करण्यात आले होते. या पंधरवड्याचा समोराप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित युवकांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली व नशा मुक्त भारत करण्यासाठी चा संकल्प केला व व्यसनमुक्ती जनजागृती रँली काढून जनजागृती पंधरवड्याचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले तर आभार प्रदर्शन एन एस एस कार्यक्रम अधिकारी संदिप उगले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व दिशा संस्थेचे सचिन महाजन, दुर्गेश अंबेकर, संतोष चौधरी, अरविंद पाटील, अवधूत दलाल यांनी परीश्रम घेतले.