Wednesday, September 28, 2022

महागाईची झळ.. सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी केली दरवाढ

- Advertisement -

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

दिवसेंदिवस महागाईची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. त्यात आणखी भर पडली आहे. आता राज्यात सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांची दरवाढ केली आहे. त्यामुळे दाढी करणे आणि केस कापणे महागले आहे. तर महिलांना सौंदर्य प्रसाधन केंद्रामध्ये जाण्यावर थोडे निर्बंध येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

- Advertisement -

सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी दरवाढचा हा निर्णय राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत घेतला आहे. त्यानुसार शहरी आणि ग्रामीण भागात 30 टक्के दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ 1 मे कामगार दिनपासून होणार आहे. नव्या दरवाढ निर्णयाची अंमलबजावणी आता होणार आहे.

नागरिकांनी देखील दरवाढीला सहकार्य करावे, असे अवाहन सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी केले आहे दररोजच्या विविध प्रकारचा वाढत्या महागाईमुळे दरवाढ करण्यात आल्याची माहिती सोमनाथ काशिद दिली आहे. राज्यभरातून दरवाढ करणेसाठी व्यावसायिकांची मागणी होत होती. असोसिएशनचे 52000 सलून आणि ब्युटी पार्लर चालक सदस्य आहेत, अशी माहिती सोमनाथ काशिद यांनी दिली आहे.

दरवाढीचे प्रमुख कारणे देताना ते म्हणाले, ब्युटी प्रॉडक्ट, पेट्रोल, गॅस सिलिंडर, खाद्यतेल, शाळांची वाढविण्यात आलेली फी तसेच कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन नंतर व्यवसायामध्ये 50 टक्के ग्राहकांची झालेली कमी आणि वाढती बेरोजगारी. सरकारचे कायमच नाभिक समाज आणि सलून , ब्युटी पार्लर व्यवसायिक यांच्या मागण्यांकडे सुरु असलेले दुर्लक्ष झाले. त्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे, असे सोमनाथ काशिद म्हणाले.

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या