सलमान खान सोबत काम करणाऱ्या मुलीला करावं लागतं हे… अभिनेत्रीने सगळं सांगितलं…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सलमान खानच्या नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणाने प्रकाशझोतात राहत असतो. आता सध्या त्याचा नवीन चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ चे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात बरेच नवीन चेहेरे बघायला मिळणार आहेत. यामध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने महिला सहकाऱ्यांसाठी केलेल्या नियमाबद्दल पलकने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. सिद्धार्थ कन्नन या युट्यूबरबरोबर संवाद साधताना पलकने या चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. तिने सेट वरील एक विशेष नियमाविषयी सांगितले आहे. शिवाय सलमान खानच्या सेटवरील या नियमामुळे पलकची आई आणि अभिनेत्री श्वेता तिवारीचा जीवही भांड्यात पडल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं.

तिने सांगितले कि, सलमानच्या सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींनी स्वतःचे अवयव नीट झाकले जातील असे कपडे घालायची सक्ती करण्यात आल्याचं पलकने स्पष्ट केलं. याविषयी बोलताना पलक म्हणाली, “सलमान सर खूप पारंपरिक आहेत. मुलींनी जे योग्य वाटेल ते कपडे परिधान करावे पण सर्वांनी सुरक्षित असावं हा त्यांचा हेतू असतो. सेटवर बरेच अनोळखी पुरुष वावरत असतात त्यामुळे प्रत्येकावर पूर्ण विश्वास टाकणं त्यांना जमत नाही. त्यामुळे सेटवरील मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी हा नियम केला आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.