सलमान खानला जीवे ठार मारण्याची धमकी

तब्बल इतक्या कोटींची केली मागणी 

0

 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान मोठ्या अडचणीत सापडला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अवघ्या पाच दिवसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

५ कोटी रुपयांची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर धमकीचा मेसेज आला आहे. त्यात म्हटले आहे की, लॉरेन्स बिश्नोईबरोबरचा दीर्घकाळ चाललेला वाद मिटवला जाऊ शकतो आणि त्यासाठी सलमान खानकडून ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बिश्नोई टोळीचा जवळचा असल्याचे सांगितले आहे. सलमान खानने पैसे न दिल्यास त्याचे नशीब बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल, असे धमकीवजा पत्र लिहिले आहे.

‘हलक्यात घेऊ नका’

ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला आहे, ज्याच्या शेवटी ‘हलक्यात घेऊ नका’, असेही लिहिले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानला मिळालेल्या या नव्या धमकीची चौकशी सुरु झाली आहे. गुन्हे शाखा त्याची गांभीर्याने दखल घेत आहे. संदेश पाठवणाऱ्याचा माग काढला जात आहे. याशिवाय यामागे काही खोल कट आहे का, याचाही तपास सुरु आहे. दुसरीकडे, सलमान खानच्या कुटुंबीयांना त्याच्या सुरक्षेची चिंता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.