google-site-verification=mM8CBsrTJUKkDYK85cszLU0B8abumgHsWiDED3Kbzfs google-site-verification: googleeb4475734fb16033.html

अखेर सलमानला शस्त्र परवाना मंजूर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपूर्वी सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर सलमान खानची (Actor Salman Khan) सुरक्षा कडक करण्यात आली होती. सलमाननं शस्त्र परवाना संदर्भातही अर्ज केला होता. यांविषयी आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

सलमानला जीवे मारण्याच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांकडून  (Mumbai Police) सलमान खानला शस्त्र परवाना  (issued an Arms license) जारी करण्यात आला आहे. धमक्या मिळाल्यानंतर सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता. अखेर सलमानला आत्मसंरक्षणासाठी मुंबई पोलिसांकडून शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे.

5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड येथील सलीम खान यांच्या गार्डला धमकीचे पत्र मिळाले होते. सलमानला धमकीच्या पत्रात सिद्धू मूसवालासारखंच तुझंही हाल केले जाईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे सलमान आणि कुटुंबिंयांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, यापूर्वीही अनेक वेळा सलमानला धमक्यांना सामोरं जावं लागलं आहे. लॉरेन्स बिश्नोईला सलमान खानची हत्या करून 1998 च्या काळवीट शिकारीचा बदला घ्यायचा आहे. रिपोर्ट्सनुसार, बिश्नोईने स्वतः पोलिस रिमांडमध्ये खुलासा केला आहे की, 2018 साली सलमान खानच्या हत्येसाठी त्याने सर्व तयारी केली होती. यासाठी त्याने एक खास रायफलही खरेदी केली होती, ज्यासाठी त्याने 4 लाख रुपये दिले होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *