Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»मुंबई पोलीस दलात वेतन घोटाळा उघडकीस
    महाराष्ट्र

    मुंबई पोलीस दलात वेतन घोटाळा उघडकीस

    दोन पोलीस आरोपींवर निलंबनाची कारवाई
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 4, 2026No Comments282 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबई पोलीस दलात वेतन घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई झाली आहे. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तत्कालीन प्रमुख लिपिक आरोपी विजया चव्हाण आणि तत्कालीन वरिष्ठ लिपिक अमोल मेम्राम यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दोघांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

    समतानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करून आणि कट रचून वेतन घोटाळा केल्याचा आरोप आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघेही ‘सेवेतून निलंबित’ राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सहपोलीस आयुक्त प्रशासन यांच्याकडून निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

    पोलीस नसलेल्या व्यक्तींना पोलीस कर्मचारी असल्याचे दाखवून कोट्यवधींचा वेतन घोटाळा केल्याचा आरोप आहे. तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण यांच्यासह इतरांवर गंभीर आरोप आहेत. खोटी वेतन देयके सादर करून शासकीय निधीचा गैरवापर व अपहार केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात शासनाची तब्बल ६ कोटी ४१ लाख १४ हजार ३६ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

    प्रमुख लिपिक अजय राठोड व कनिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांचाही प्रकरणात समावेश आहे. संबंधितांविरोधात फसवणूक, अपहार, बनावट कागदपत्रे तयार करणे व पुरावे नष्ट करण्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. भादंवि कलम 409, 420, 406, 467, 465, 471, 201, 120 (ब) व 34 अन्वये कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    2019 आणि 2020 मध्ये हा घोटाळा झाला. 2019 च्या डिसेंबरमध्ये आणि त्यानंतर 2020 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, त्यानंतर जून ते सप्टेंबर 2020 दरम्यानच्या वेतनात हा घोटाळा झाल्याचा संशय आहे. तपासात 2019 ते 2020 मधील वेतन खात्यात तफावत आढळून आली आहे. वेतन व प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासकीय आणि वेतन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा अपहार केल्याचा संशय आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif