साकळी परीसरात उद्या विविध कामांचे भुमीपुजन

0

मनवेल ता.यावल : लोकशाही न्युज नेटवर्क

साकळी येथे चोपडा विधानसभेच्या आ.लताताई चद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मजूंर झालेल्या विविध कामांचे भुमीपुजन ३१ मार्च रोजी शुक्रवारी होत आहे.

साकळी येथे एक कोटी ६१ लाख ,चुंचाळे येथे ८९ लाख , मनवेल येथे ४५ लाख ,थोरगव्हाण ४६ लाख रुपयांची पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ होणार आहे. तसेच साकळी मनवेल शिरसाड थोरगव्हाण येथे रस्ता काँक्रीटिकरण तर पथराडे शिरागड नावरे येथे प्रत्येकी पाच लाख रुपयांची रस्ता पेव्हर बाँल्क बसविण्यात येणार आहे. माजी आ.चद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थित विकास कांमाचे भुमीपुजन करण्यात येणार असून यावेळी तालुक्यातील विविध मान्य वर उपस्थित राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.